मुज्फरनगर – उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यात तीन जण करोना पॉझिटीव्ह आढळले असून हे तिघेही जमातचे सदस्य आहेत आणि ते दिल्लीत निजामुद्दीन येथे झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यातील दोन जण बांगला देशाचे नागरीक आहेत असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी जसजीतकौर यांनी सांगितले की या तिघांनाहीं सरकारी रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
तबलिघी जमातीचे 13 जण या जिल्ह्यातील भेसनी गावात आले होते त्यातील बारा जण बांगलादेशी असून एक जण आसामातील आहे. त्या सर्वांना शोधून काढण्यात आले असून त्यांना एका महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यातील तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बाकीच्यांना निरीक्षणाखालीच ठेवले जाणार आहे.