नगर – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. महापालिका क्षेत्रात तसेच 14 तालुक्यात ही यंत्रणा उभी करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधून (सीसीसी) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहे. आजाराची लक्षणे दिसतील त्यांना विशेष कोविड हेल्थ सेंटर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येईल.
सीसीसीसाठी जिल्ह्यात 4 हजार 100 बेडस उपलब्ध केले तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी 1 हजार 29 बेडस उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे.याशिवाय जिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड- हॉस्पिटलसाठी बेडस उपलब्ध असतील.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणा आणि महापालिका आरोग्य विभागाशी समन्वय करुन यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची कार्यवाही पूर्ण करुन अंमलबजावणीसाठी ही यंत्रणा सज्ज झाली आहे.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सीसीसी, डीसीएचसी आणि डीसीएच सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला पाठविल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीसीसाठी विविध बांधून पूर्ण झालेल्या इमारती, वसतीगृहे अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या सेंटरमध्ये तापाच्या रुग्णांवर उपचार केले जातील. ताप कोविड सदृश्य आजारामुळे असल्याचे निदान झाल्यास अशा रुग्णास संशयित रुग्ण कक्षात दाखल केले जाईल, अशा रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तपासणीअंती कोविड संसर्ग असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच रुग्णास आजाराची लक्षणे नसल्यास याच सीसीसीमधील विलगीकरण कक्षामध्ये त्याला दाखल केले जाईल.
चाचणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढील औषधोपचार देऊन घरी पाठवण्यात येईल. मात्र, रुग्णास मध्यम तीव्रतेचा आजार असल्यास त्याला विशेष अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असणार आहे. तीव्र असल्यास त्याला थेट डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात येईल.
सीसीसीसाठी तालुकानिहाय विविध इमारतीमध्ये केलेली व्यवस्था आणि कंसात बेडसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अकोले तालुक्यात शासकीय आदिवासी वसतीगृह, खानापुर (60), मंगला नर्सिंग होम (50). जामखेड – रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन (240), कर्जत – दादा पाटील विद्यालय मुलींचे वसतीगृह (50), गायकरवाडी आश्रम शाळा, गायकरवाडी (150), महात्मा गांधी विद्यालय, मुलांचे वसतीगृह (50). कोपरगाव- एस. एस. जी. एम. कॉलेज वसतीगृह (100), नगर – रायसोनी कॉलेज, चास (325), नेवासा- त्रिमुर्ती वसतीगृह, नेवासाफाटा (240), पारनेर – राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेज, कर्जुलेहऱ्या (50), अपंग निवासी विद्यालय, टाकळी ढोकेश्वर (25), संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, राळेगणसिध्दी (50), गर्व्हशनमेंट लेडिज वस्तीगृह (25), न्यु आर्टस बॉईज हॉस्टेंल (50), न्यु आर्टस गर्ल्स हॉस्टेल (40), पाथर्डी- श्री टिळक जैन विद्यालय (100), वसंतदादा पाटील हॉस्टेल (100), राहाता – द्वारावती शिर्डी (240), राहुरी -महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पीएचडी होस्टेल (240), संगमनेर- सिध्दरकला हॉस्पिटल संगमनेर खु. (150), शेळके हॉस्पिटल (100).
शेवगाव – त्रिमूर्ती पब्लिक स्कूल वसतीगृह (250), श्रीगोंदा – समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह, (100), छत्रपती शिवाजी कॉलेज मुलींचे वसतीगृह (240), समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतीगृह (75). श्रीरामपूर- मेडिकल कॉलेज वडाळा महादेव (700), बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण वसतीगृह, हरेगाव रोड (300). नगर महापालिका क्षेत्र – दीपक हॉस्पिटल (50), बुथ हॉस्पिटल (50).
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अर्थात डीसीएचसीसाठी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडसची
संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे-
अकोले- डॉ. बुळे हॉस्पिटल (20), डॉ. भांडकोळी हॉस्पिटल (20), जामखेड – सीआरएचपी (100), कर्जत – उपजिल्हा रुग्णालय (50), कोपरगाव- आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण (100), नगर- ग्रामीण रुग्णालय, चिचोंडी पाटील (30), नेवासा- शनैश्वर ग्रामीण रुग्णालय शिंगणापुर (25), एफ. जे. एफ. एम. वडाळा मिशन हॉस्पिटल, वडाळा बहिरोबा (25), पारनेर – ओमकार हॉस्पिटल, सुपा (50), निरामय हॉस्पिटल, सुपा (30), पाथर्डी – उपजिल्हा रुग्णालय (50), राहाता- साईनाथ हॉस्पिटल, शिर्डी (100), राहुरी- स्वामी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद कॉलेज (50), डॉ.कोरडे हॉस्पिटल, राहुरी (13), डॉ. नेहे चाईल्य हॉस्पिटल, राहुरी (7), श्री कृष्णा ऍक्सिरडेंट हॉस्पिटल, राहुरी (10).
संगमनेर-संजीवनी हॉस्पिटल, संगमनेर (50),मालपाणी हॉस्पिटल, संगमनेर (50). शेवगाव ग्रामीण रुग्णालय, शेवगाव (15), श्रीगोंदा – स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशॅलिस्ट हॉस्पिटल (86), मोरेदादा हॉस्पिटल, श्रीगोंदा (48). श्रीरामपूर – संत लूक्स हॉस्पिटल श्रीरामपूर (50) आणि नगर महापालिका क्षेत्र एआयएमएस हॉस्पिटल (50).