कराड तालुक्यातील मालखेड, विजयनगर व ओगलेवाडीतील घटना
कराड – कराड तालुक्यातील ओगलेवाडी, विजयनगर व मालखेड या तीन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील मालखेड येथील अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता झाला. तर अन्य दोन अपघात शुक्रवारी झाले.
अशोक बबन कदम (वय 42, रा. रेठरे धरण, ता. वाळवा) हे मालखेड येथे व विजया एकनाथ सकट (वय 36, रा. विद्यानगर) यांचा ओगलेवाडीजवळ तर शकूर मकबुल पटेल यांचा विजयनगर येथील अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, मालखेड येथे महामार्गावर उभ्या असलेल्या दुधाच्या टॅंकरला दुचाकीवरून आलेल्या अशोक कदम यांची जोराची धडक बसली.
या अपघात कदम जागीच ठार झाले. ओगलेवाडी येथील अपघातप्रकरणी फिर्यादी प्रथमेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण पूजा व तिची मैत्रिण विजया सकट या दुचाकीवरून (एमएच 50 एच 0589) विद्यानगर येथून वनवासमाची येथे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. दुपारी 12 च्या दरम्यान कराड- विटा रस्त्यावर ओगलेवाडी गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या डंपरने (एमएच 50- 9006) दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये सकट यांच्या डोक्यास गंभीर मार लागला.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.