कराड : ऊस वाहतूक करणारी टोळी घेऊन सातारकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोची पाठीमागून जोरात धडक बसली. यात आयशर ड्रायव्हर पुटाप्पा जयप्पा बेनकरशेट्टी (वय २५, रा. अगळवाडी जि. बेळगाव) हा जागीच ठार झाला.
तर ऊस टोळीतील नामदेव साखरे (वय २७) याच्यासह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. वनवासमाची (ता. कराड) येथे महामार्गावर बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.