उत्तरप्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बलरामपुर – उत्तरप्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. जोगीयापुर गावात हा प्रकार घडला. या तीन व्यक्तींची झोपेत असतानाच हत्या केली गेली आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यात ठार झालेल्यांमध्ये घरमालक जगराम (वय55), मुलगा राजू (वय 25) आणि सून लिलावती (वय 20) यांचा समावेश आहे. हत्येचे नेमके कारण समजलेले नाही.

या घटनेमुळे या परिसरात मोठीच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र चौकशी पथक स्थापन केले आहे. या तिन्ही जणांची हत्या धारदार शस्त्रांनी वार करून करण्यात आली आहे. कोैंटुंबिक कारणावरून ही हत्या झाली असावी असे सांगितले जात असले तरी पोलिस सर्व शक्‍यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.