सातारा जिल्ह्यात तीन जणांचा करोनामुळे मृत्यू; आणखी 90 नागरिक करोनाबाधित

सातारा – आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये तीन नागरिकांचा कोविड19 मुळे मृत्यू झाला असून, 90 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात अपयश येत आहे. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता दररोज दोन ते तीन मृत्यू होत आहेत. त्याचबरोबर पॉझिटिव्ह अहवालांची संख्याही कमी-अधिक होत असल्याने नागरिकांनी नियम व प्रशासनाने घातलेले निर्बंध कसोशीने पाळण्याची गरज आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात सदरबझार सहा, मंगळवार पेठ, बुधवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र तीन, संभाजीनगर, खोजेवाडी प्रत्येकी दोन, गोजेगाव, कळंबे, वाजेवाडी, वाढे, वाढे फाटा, शिवथर प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात सैदापूर तीन, कराड शहर, येरवळे, विद्यानगर, गोळेश्वर, कोळे, मुंडे, मलकापूर प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यामध्ये वाई शहरात दोन, धोम कॉलनी, बावधन प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यामध्ये फलटण शहरात सगुणामातानगर, मंगळवार पेठ प्रत्येकी एक, फरांदवाडी दोन, कोळकी, विडणी, काळज, सरडे, मांडवे प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात मोळ, राजाचे कुर्ले, नेर,

पुसेगाव प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात एकंबे तीन, रहिमतपूर दोन, आसनगाव, सासुर्वे, धामणेर, बेलवडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ पाच, तांबवे दोन, लोणंद, खंडाळा, मोर्वे, अहिरे, देवघर, कापडगाव, पारगाव प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात महाबळेश्वर, भिलार, पाचगणी प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात मेढा, कावडी प्रत्येकी दोन, म्हसवे एक, इतर चार, बाहेरील जिल्ह्यातील सांगली दोन, कोल्हापूर, नवी मुंबई प्रत्येकी एक, असे 90 नागरिक करोनाबाधित झाले आहेत.

त्याचबरोबर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दहिवडी, ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना संगमनगर, सातारा येथील 62 वर्षीय पुरुष व गणेश सोसायटी, सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, अशा तीन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1843, तर बाधितांची एकूण संख्या 57 हजार 671 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.