Amir Khan | बॉलिवूडमधील तीन खान अर्थात शाहरुख, सलमान आणि आमिर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या तिन्ही कलाकारांनी आजवर सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु आजपर्यंत हे तिघं एकत्र पडद्यावर झळकलेले नाहीत. अनेकदा हे तिघे एकत्र एका सिनेमात कधी पाहायला मिळणार? असा सवालही केला जातो. यावर आता अभिनेता आमिर खानने भाष्य केले आहे.
नुकतेच आमिर खानला ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने सलमान आणि शाहरुखसोबत सिनेमा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. आमिर म्हणाला की, “मला वाटतं सलमान खान आणि शाहरुख खान दोघांचीही यासाठी संमती आहे. त्यांचंही असं म्हणणं होतं की, आपण तिघांनी एकत्र काम केलं पाहिजे, त्यामुळे आशा आहे की हे लवकरच पूर्ण होईल. आता फक्त चांगल्या स्क्रीप्टची प्रतिक्षा आहे.” Amir Khan |
“जवळपास सहा महिन्यांपूर्वी मी, शाहरुख आणि सलमान एका कार्यक्रमात एकत्र भेटलो होतो, त्यावेळी आम्ही यावर चर्चा केली. खरंतर मी स्वत:च हा मुद्दा सुरू केला होता. मी शाहरुख आणि सलमान खानला म्हटलं, जर आपण तिघांनी एकत्र एका चित्रपटात काम केलं नाही तर ही खरोखर एक दु:खद बाब असेल,” असे त्याने म्हंटले. Amir Khan |
आमिर खान ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर सलमान खानचा ‘सिकंदर’ ही येतोय. शाहरुख खान सध्या ‘किंग’ चित्रपटाचे शुटींग करत आहे.