दक्षिण काश्‍मीरमध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

File photo

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक त्राल भागात घडली. ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. चकमकीबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील दुसऱ्या घटनेत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला.

पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करून राजौरी जिल्ह्यात मारा केला. त्याचा आधार घेऊन काही दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. मात्र, भारतीय लष्कराच्या सतर्क पथकाने त्यांना गोळीबार करून रोखले. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत लष्करी अधिकारी मृत्युमुखी पडला. ती चकमक रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)