शिराळा – येथील श्री गोरक्षनाथ मंदिराजवळील वळण रस्त्यावर एसटी बस व मोटारसायकल यांची धडक होऊन तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांचेवर इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वैभव गणपती सावंत, अजित जालिंदर कर्ले, पोपट शामराव पवार (तिघे रा. चिखलवाडी) अशी जखमी युवकांची नावे आहेत.
एसटी बस (क्रमांक एम. एच. 12 इ. एफ. 6490) ही बस मांगलेकडे तर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 12 इ. आय. 7586) हे शिराळाकडे येत असता त्यांची धडक होऊन वैभव सावंत, अजित कर्ले, पोपट पवार ( तिघे रा. चिखलवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अशोक रंगराव पाटील (रा.चिकूर्डे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार डी. एस. खोमणे करीत आहेत.