लंडन –ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी दाखल झालेल्या तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांच्या नव्याने केलेल्या चाचणीत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील एक कर्मचारी देखील करोनाबाधित आढळला होता. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.