सनी देओल आणि बॉबी देओल या बंधूंनी सोमवारी “अपने 2′ ची घोषणा केली. फॅमिली ड्रामा असलेल्या “अपने’च्या सिक्वेलमध्ये देओल घराण्याच्या तीन पिढ्या असणार आहेत. धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांच्या बरोबर सनीचा मुलगा करण देओलदेखील या सिनेमात असणार आहे.
View this post on Instagram
सनी आणि बॉबी या दोघांनी सोशल मीडियावर “अपने 2’चे पोस्टर शेअर केले आहे आणि त्याबरोबर तीन पिढ्या एकत्र काम करत असल्याची घोषणाही केली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित “अपने 2’ची निर्मिती दीपक मुकुट करणार आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.
View this post on Instagram
एका घरातील कौटुंबिक मूल्यांची जोपासना होणे किती महत्वाचे असते, हाच सर्वसाधारण संदेश “अपने 2’मध्ये दिला जाणार आहे. 2007 मध्ये रिलीज झालेला “अपने’ हा स्पोर्टस ड्रामा होता. त्यामध्येही धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल होते.
View this post on Instagram
त्यांच्या बरोबर शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ देखील लीड रोलमध्ये होते. सनी आणि बॉबी हे धर्मेंद्रबरोबर दोन सिनेमांमध्ये दिसले. पण त्यांच्या बरोबर ईशा आणि हेमाजी कधी दिसणार ? या दोघीही दिसल्या की फॅमिली पूर्ण होऊन जाईल.
View this post on Instagram