पुणे – पुण्यातून निवडून गेलेल्या आठपैकी तीन उमेदवार उच्चशिक्षित असून, ते इंजिनिअर आहेत. त्यामध्ये महाआघाडीचे वडगाव शेरी-सुनील टिंगरे, हडपसर-चेतन तुपे हे दोघेही सिव्हिल इंजिनिअर आहेत. तर शिवाजीनगरमधून निवडून आलेले भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
राजकारणात येणाऱ्यांमध्ये आणि करियर करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून पुण्यातील आठ आमदारांपैकी तीनजण उच्चशिक्षित आहेत. याशिवाय मुक्ता टिळक आणि अन्य काही आमदार हे पदवीधर आहेत.