Accident | लग्नाहून परतताना दुचाकीची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक; एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

बिजनोर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे लग्नाहून परतताना दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी गजरौला-धनौरा रस्त्यावर घडली. अरबाज बलवा (20 वर्ष), वसीम अहमद (20 वर्ष), मोहम्मद सलमान (19 वर्ष) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अरबाज, वसीम आणि मोहम्मद धनौरा येथील एका नातेवाइकाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. सायंकाळी लग्नाहून परतत असताना त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा मेरठ येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

लग्नानिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना परिवारातील तिन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.