रायपूर – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या नव्याने उभारलेल्या छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एलमागुंडा कॅम्पच्या परिसरात सकाळी नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार सुरू केला, त्यानंतर तेथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवादी पळून गेले परंतु तो पर्यंत त्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले.
सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल हेमंत चौधरी आणि कॉन्स्टेबल बसप्पा आणि ललित बाग हे या घटनेत जखमी झाले आहेत, या जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना चांगल्या उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येत आहे.