चालक वाहकांना सलग तीन मुक्कामी ड्युटी; इस्लामपूर आगारातील मनमानी

इस्लामपूर (विनोद मोहिते) – देशभर कोविड ची महामारी सुरू असताना लांब पल्ला ड्युटी साठी चालक वाहकाना सलग तीन दिवसाच्या मुक्कामी ड्युटी साठी पाठवून कामगारांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार इस्लामपूर आगारात सुरू आहे. हा प्रकार बंद न झाल्यास काळ्या टोप्या घालून आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिला आहे.

या बाबत कामगार संघटनेने इस्लामपूर आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,सध्या ५०टक्के वाहतूक सुरू आहे. पूर्वी झालेल्या संघटना प्रतिनिधी बैठकीत मध्यम लांब पल्ला नियमित नियते करून लांब पल्ला वाहतुकीचा चालक वाहक ग्रुप तयार केला होता.हे सर्व कामगारांना मान्य असताना आगारव्यवस्थापकांनी अचानकपणे सर्व कर्तव्य एक करून कामगार कर्तव्य तक्ता तयार केला आहे.

तो अन्याय कारक आहे.या मध्ये कामगारांना एक कर्तव्य करताना तीन दिवस बाहेर मुक्काम करावा लागणार आहे. कोविड महामारीत कामगारांच्या जेवणाची व राहण्याची गैरसोय होणार आहे.प्रसंगी कोविड ची लागण होऊ शकते.सध्या वेळेवर पगार नसल्याने लोकांची आर्थिक अडचण आहे.

शिवाय सर्व नियते एक केल्याने वाहक तिकीट मशीन जादा अडकून पडणार आहेत. त्याचबरोबर रोज नवीन चालक वाहकामुळे उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. प्रवाशी तक्रारी वाढतील. या सर्व कारणांचा विचार करता ही पद्धत बंद करावी. यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास काळ्या टोप्या घालून संघटना आंदोलन करेल तसेच नियमानुसार काम आंदोलन होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.