जातिवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी – राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलवून वरिष्ठांनी जातिवाचक अपशब्द बोलल्याचा प्रकार बाणेर येथील एका कंपनीत घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना बाणेर येथील कॉनकोर्ड मोटर्स इंडिया लिमिटेड येथे 30 मे रोजी घडली. विशाल अंकुश म्हस्के (वय 36, रा. औंध) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विक्रम गुळवणी, सारा श्रीपाद, दीपक रावोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल म्हस्के हे बाणेर येथील कॉनकोर्ड मोटर्स इंडिया लिमिटेड येथे सिनीयर कस्टमर ऍडव्हायझर पदावर नोकरी करत होते.

कंपनीने ठरवल्याप्रमाणे गाड्यांच्या विक्रीबद्दल विशाल यांना बोनस दिला नाही. तसेच प्रवासाची बिले देखील दिली नाहीत. त्यामुळे विशाल यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यावरून कंपनीचे सीईओ विक्रम गुळवणी, एचआर सारा श्रीपाद आणि जनरल मॅनेजर दीपक रावोत यांनी विशाल यांना बोलावून घेतले आणि सीईओच्या सांगण्यावरून अन्य दोघांनी विशाल यांना जातीवाचक अपशब्द बोलून अपमान केला. याबाबत विशाल यांनी तिघांविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.