काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज एकाच दिवशी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये एक जण ठार झाला आणि किमान 17 जण जखमी झाले आहे.
या तिन्ही बॉम्बस्फोटात एक व्यक्ती ठार झाला. तर एकूण 17 जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. मात्र तालिबान आणि इस्लामिक स्टेटकडून अलिकडच्या काळात असेच बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते.