बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप : तिघाना अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात गजबजलेल्या बँडस्टँड भागात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसोबत आणखी दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे.

20 वर्षीय पीडित तरुणी आपला बॉयफ्रेण्ड आणि दोघा तरुणांसह वांद्रे पश्चिममधील समुद्र किनारी असलेल्या बँडस्टँड भागात फिरायला गेली होती. पीडिता आणि तीन आरोपी हे मानखुर्द परिसरातील रहिवासी आहेत. सर्व जण 20 ते 23 वर्ष वयोगटातील आहेत.

दोन बाईक्सवर हे चौघे जण 11 मे रोजी रात्री बँडस्टँडला फिरायला आले होते. तिघांनी तरुणीवर बँडस्टँड भागात समुद्राजवळ तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर चौघंही जण घरी परतले. गेल्या आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली होती.

घरी गेल्यावर पीडितेने आपल्या बहिणीला पोटात दुखत असल्याचं सांगितलं. बहिणीने खोदून विचारलं असता पीडितेने आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराविषयी सांगितलं. बहिणीने दुसऱ्या दिवशी पीडितेला बांद्रा पोलिसात नेऊन तक्रार दिली.

सुरुवातीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गँगरेप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वांद्रा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. बांद्रा पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास बांद्रा पोलीस अधिकारी करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.