राजगुरूनगर – तडीपार कुख्यात गुंड पप्पु उर्फ राहुल कल्याण वाडेकर याच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
राजगुरुनगर जुन्या भांडणा गुंडगिरीच्या वर्चस्वातून तडीपार कुख्यात गुंड पप्पु उर्फ राहुल कल्याण वाडेकर याचा रविवारी (दि. १२) रात्री निर्घुणपणे खुन करण्यात आला होता याप्रकरणी खेड पोलिसांच्या डीबी पथकाने मिलिंद विठ्ठल जगदाळे याला तर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे व जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे याना पकडून अटक केली आहे.
पप्पु उर्फ राहुल वाडेकर यांचे पाटणे व जगदाळे यांच्याशी जुन्या भांडणातून वैर होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून मिलींद जगदाळे, मयुर जगदाळे, बंटी जगदाळे, सचिन पाटणे, मारुती थिगळे, तौफिक शेख यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने पप्पु उर्फ राहुल वाडेकर याचेवर होलेवाडी परिसरात पिस्तुलातून गोळी फायर करून नार पाठलाग करून तीष्ण हत्याराने वार करीत दगडाने चेहरा ठेचून खून केला अशी मयत पप्पु वाडेकर याचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सतीश गुरव याना सूचना करून तपास पथक तयार करून आरोपीना तात्काळ पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक हे राजगुरुनगर परीसरात तपास करत असताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आरोपीबाबत गोपनीय बातमी मिळाली होती. तपास पथकाने सापळा रचुन बंटी उर्फ विजय विठ्ठल जगदाळे व जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे वय ३१ वर्षे, सध्या रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर, ता. खेड याना अटक केली तर खेड पोलिसांच्या डीबी पथकाने मिलिंद विठ्ठल जगदाळे यांना अटक केली आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील गाढवे, निखिल गिरीगोसावी, शेखर भोईर, सचिन जतकर तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन काळे, नेताजी गंधारे, राजेंद्र थोरात, विक्रम तापकिर, ज्ञानेश्वर श्रीरसागर, जनार्धन शेळके, राजु मोमीन, दिपक साबळे, सचिन गायकवाड, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे या पोलिसांनी आरोपीना जेरबंद केले.