पुणे – रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तीघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने(2) अटक केली. त्यांच्याकडून एका पिकअपसह 32 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
विकी संजय साबळे (19-,रा.मांजरी,हडपसर), रोहीत रवी रुद्राप (20- रा.शिवनेरी नगर,कोंढवा) ऍलेन कन्हैय्या वाघमारे (25- रा.कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खंडणी विरोधी पथक हद्दीमध्ये अवैध कारवायांबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार भूषण शेलार व अमोल पिलाणे यांना खबर मिळाली होती. त्यानूसार कोंढवा परिसरामधून एक महिंद्रा पिकअप प्रतिबंधित रक्तचंदन घेवून लोणी काळभोर परिसरात विक्रीसाठी येणार होते. त्यानूसार लोणी काळभोर टोलनाक्याजवळ सापळा लावला आला. तेथे एक महिंद्रा पिक अप संशयास्पद रित्या जाताना दिसला. त्यास पकडून आतील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 270 किलो वजनाचे 27 लाख रुपये किंमतीचे रक्तचंदन मिळून आले.
रक्तचंदन व टेम्पो असा एकूण 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विकी व रोहीत हे चंदनाची वाहतूक करत होते. तर ऍलेन वाघमारे याने चंदन विक्रीसाठी त्यांना दिले होते. त्यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला
आहे.रक्तचंदन पडताळणी कामी वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे व वनरक्षक मनोज पारखे यांनी मदत केलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह- आयुक्त,डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उप-निरीक्षक,विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विनोद साळूके, भूषण शेलार, विजय गुरव, राहुल उत्तरकर, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, चेतन गिरी, प्रदिप गाडे,मोहन येलपल्ले, रुपाली कर्णवर व आशा कोळेकर यांनी केली आहे.