पुणे-दौंड रेल्वे मार्गावर साडेतीन तास ब्लॉक

पुणे – पुणे विभागांतर्गत दि. 20 रोजी उरूळी ते यवत स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव साडेतीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे ते दौंड मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

पुणे स्थानकाहून 14.45 वाजता दौंडकडे धावणारी डेमू (71409) आणि दौंड स्थानकाहून 17.10 वाजता पुणे स्थानकाकडे येणारी डेमू (71410) रद्द करण्यात आली आहे. बारामती स्थानकाहून 10.40 वाजता पुणे स्थानकाकडे सुटणारी बारामती-पुणे पॅसेंजर (51452) गाडी दौंड स्थानकापर्यंत धावणार आहे. दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान गाडी धावणार नाही.

पुणे ते निजामाबाद पॅसेंजर (51421) नियोजित वेळेनुसार दौंड ते निजामाबाद या मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुणे स्थानकाहून 14.25 वाजता सुटते, मात्र ब्लॉकमुळे पुणे ते दौंड मार्गावर गाडी धावणार नाही. मुंबई -बंगळुरू उद्यान एक्‍सप्रेस (11301) पुणे विभागामध्ये 2 तास 20 मिनिटांपर्यंत थांबे (थांबत थांबत) घेणार आहे. तर जम्मूतावी-पुणे झेलम एक्‍सप्रेस (11078) केडगाव स्थानकावर सुमारे 30 मिनिटे थांबणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.