वॉशिंग्टन – बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवून अमेरिकेतील हजारो नागरीकांना तब्बल 3.7 दशलक्ष डॉलर्सना टोपी घालणाऱ्या आठ जणांना तेथील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवून सहा महिने ते चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यात तीन अमेरिकी भारतीय नागरीकांचा समावेश आहे.
मोहंमद काझीम मोमीन, मोहंमद शोएब मोमीन आणि पलककुमार पटेल अशी शिक्षा झालेल्या तीन मूळ भारतीय नागरीकांची नावे आहेत. हे सर्व जण अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात राहणारे आहेत. त्यांच्यासह अन्य पाच जणांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या लोकांनी भारतात अहमदाबाद येथे एक कॉल सेंटर उघडले होते. तेथून ते अमेरिकन नागरीकांना टोपी घालण्याचे काम करीत होते. हे लोक अमेरिकेच्या इंटरर्नल रेव्हेन्यु सर्व्हिचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरीकांना टॅक्स न भरल्याचे कारण दाखवून त्यांच्यावर कारवाईच्या धमक्या देत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असत. तसेच काही वेळा ते अन्यही कारणे दाखवून वृद्ध ूअमेरिकन नागरीकांना फसवत असत. त्या रॅकेटच्या भारतातील हस्तकांनाहीं शिक्षा करण्याचा मनोदय अमेरिकन सरकारच्या ऍटर्नींनी न्यायालयात नमूद केला त्यानुसार सरकारी पातळीवरही त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.