बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन या वास्तविक जीवनातही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या तिन्ही मैत्रिणी अनेकवेळा एकत्रित वेळ घालवत असतात. सध्या वहिदा, आशा आणि हेलन या अंदमान येथे सुटीचा आनंद घेत आहेत. या तिघींचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हे फोटो चित्रपट निर्माता तनुज गर्गने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोत वहिदा, आशा आणि हेलन एका बोटमध्ये राइडचा आनंद लुटताना दिसत आहे. अन्य एका फोटोत वहिदा ड्राइव्हर सीटवर बसलेली दिसत आहे.
आशा पारेख, हेलन आणि वहिदा रहमान या हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी नावे आहेत. या अभिनेत्रींनी 50च्या दशकात आपल्या करियरची सुरुवात केली होती. वहिदा रहमान आणि आशा पारेख या आघाडीच्या अभिनेत्री, तर हेलन या आयटम नंबरसाठी प्रसिद्ध होत्या.