वाघोली (वार्ताहर) – लोणीकंद येथे सचिन शिंदे यांच्या खुनातील तीन आरोपींनी 24 तासांत गजाआड करण्यात आले. लोणीकंद गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सचिन शिंदे (दि. 9) दुपारी सहकाऱ्यासह गप्पा मारीत होते. अचानक एका व्यक्तीने पिस्तूलमधून शिंदे यांच्या पाठीमागून येऊन गोळी झाडली. सहकाऱ्याच्या मदतीने ते अहमदनगर रोडने पेरणे गावचे दिशेने पळून गेले. गुन्ह्याचे अनुषंगाने लोणीकंद गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम बनवून गुन्ह्यातील आरोपींचा तपास सुरू केला.
गुन्ह्यातील आरोपी सचिन किसन शिंदे (वय 32), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. हा गुन्हा त्यांनी आणखी साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहायक निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, हवालदार बाळासाहेब सकाटे, बाळासाहेब गाडेकर, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, नाथा जगताप, उमेश गायकवाड, ऋषिकेश व्यवहारे, सूरज वळेकर, संतोष मारकड, योगेश भंडारे, अमोल गायकवाड, राजीव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, शिवाजी ननावरे, राम धोंडगे, सहायक फौजदार दत्ता गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे, अक्षय नवले यांनी केली आहे.