नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानची पॉप सिंगर राबी पीरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत वादग्रस्त वक्तव्ये करत चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा राबी पीरजादाने ट्विटरवर पंतप्रधान मोदींची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली आहे. यासोबतच तिने स्फोटकांचा जॅकेट घालून फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे राबीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
#ModiHitler i just wish huh ? #kashmirkibeti pic.twitter.com/tAtpMH6t1U
— Rabi Pirzada (@Rabipirzada) October 22, 2019
राबी पीरजादाने ट्विटरवर मोदींचा उल्लेख हिटरल म्हणून करत त्यांच्यावर हल्ला करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोबतच काश्मिरकीबेटी हा हॅशटॅग वापरला आहे. यासोबतच तिने स्फोटकांचा जॅकेट घालून फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे राबी भारतीय ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका युजरने म्हंटले कि, हा तर पाकिस्तानचा राष्ट्रीय पोशाख आहे.
ये तो पाकिस्तान का राष्ट्रीय पोशाक है?
— प्रमोद कुमार सिंह (@Pramodk05637970) October 23, 2019
तर दुसऱ्या युजरने आम्हाला भारतीय असल्यचाा गर्व असून इथे नारळ फोडले जातात, बॉम्ब नाही. तसेच पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी या ड्रेसला राष्ट्रीय पोशाख म्हणून घोषित करावे, असा सल्ला एका युजरने दिला आहे.
गर्व है मुझे अपने धर्म पर जहां धर्म के नाम पर नारियल फोड़ा जाता है बम नहीं
— ??R.K.Dubey?? (@RKDubey7878) October 22, 2019
This is perfect representation of Terrorist country Pakistan by Pak. pop singer Rabi Pirzada https://t.co/LU1O8FZbiP
— Jatan Acharya ?? (@jatanacharya) October 23, 2019
इसे दिखाने की क्या जरूरत है
पूरी दुनिया जानती है कि पाकिस्तान एक #जिहादियों का देश है— Uday Shanker Saini (@UdayShankerSai3) October 22, 2019
ये फर्क है हिंदुस्तान पाकिस्तान में…
हिंदुस्तानी लड़की ~ @HimaDas8
पाकिस्तानी लड़की~ @Rabipirzadaसारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा …?? pic.twitter.com/VsLD0L6hIh
— AlkaSingh (@ThAlkaSingh) October 23, 2019
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंजाब वन्यजीव संरक्षण आणि उद्यान विभागाने चार अजगर आणि अन्य सरपटणारे जंगली प्राणी बेकायदेशीररित्या ठेवल्याबद्दल राबी पीरजादाविरुद्ध कारवाई केली. याशिवाय तिच्याविरुद्ध लाहोरच्या एका स्थनिक न्यायालयाने अटक वॉरण्टही जारी केले आहे.