पिंपरी – डायनिंग टेबल, एसी इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही, इनोव्हा कार माहेरहून आण. जर माहेरच्या लोकांनी या वस्तू दिल्या नाहीत तर पतीचा दुसऱ्या मुलीसोबत विवाह लाऊन देऊ म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना वाकड येथे घडली. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पती संदीप शिवाजीराव सारोळकर, सासू मीना शिवाजीराव सारोळकर, सासरे शिवाजीराव सारोळकर, दीर शिरीष शिवाजीराव सारोळकर, नणंद स्वाती संजय गाडे, नंदावा संजय गाडे (सर्व रा. प्रिस्टीन प्रो लाईफ, फेज नंबर एक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 24) फिर्याद दिली आहे. ही घटना 12 जून 2019 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहितेला लग्नात काहीही दिले नाही, असे म्हणून इनोव्हा कारची मागणी केली. कार न दिल्याने विवाहितेला आरोपींनी टोमणे देऊन छळ केला.
तसेच डायनिंग टेबल, एसी इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही, इनोव्हा कार दिले नाही तर आम्ही पती संदीप याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून देऊ अशी धमकी दिली.