पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

राहाता – हातपंपावर पाणी भरण्यावरून सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पत्रकार जितेंद्र जाधव या युवकास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राहाता पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पत्रकार जितेंद्र जाधव यांनी याप्रकरणी राहाता पोलिसात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत जाधव यांनी म्हटले आहे की, साकुरी येथील वृत्तवाहिनीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.10) सायंकाळी बसलो असताना कार्यालयाशेजारी असलेल्या सार्वजनिक हातपंपांवर पाणी भरण्याचे कारणावरून महिलांमध्ये भांडण सुरु असल्याचा आवाज झाला. तेव्हा ते भांडण सोडवण्याकरिता तेथे गेलो असता, तेथे रामा गायकवाड हा मुलगा उभा होता, त्याने आपणास पाहून मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, तुझ्यासह तुझे कुटुंब 2 महिन्यात संपवतो, अशी धमकी दिल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.