धमकी देणाऱ्या खासगी सावकाराला अटक

इस्लामपूर: व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात राहते घर जबरदस्तीने खुश खरेदी करुन द्या नाही तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देणाऱ्या इस्लामपूर येथील खासगी सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे. माणिक विठ्ठल ढोबळे ( रा. इस्लामपूर ) असे खासगी सावकाराचे नाव आहे.

जांभूळवाडी येथील माने कुटुंबाने कर्ज फेडण्यासाठी घेतलेल्या सव्वा लाख रुपयांच्या बदल्यात व्याज म्हणून १ लाख चाळीस हजार रुपये फेडले असतानाही पैशासाठी व व्याजासाठी जिवे मारणेची धमकी खासगी सावकार देत होता.

याप्रकरणी सौ सविता अनिल माने (रा. जांभूळवाडी ता. वाळवा ) यांनी फिर्याद दिली आहे. पती अनिल अशोक माने यांनी आमचे नातेवाईक दिनकर कृष्णा गायकवाड (रा. किणी) यांचा ट्रक (एम एच ०९ बी सी ६०६६ ) घेतला होता. एक्विटास फायनान्स, कोल्हापूरचे कर्ज असलेने तेव्हा नोटरी करुन घेतला होता. तो ट्रक माझे पती अनिल माने चालवित होते. परंतू तो त्यांचे नावावर झालेला नाही. घरगुती अडचणींकरीता व लोकमान्य पतसंस्था कामेरीचे कर्ज फेडण्याकरीता आम्ही खासगी सावकार माणिक ढोबळे याच्याकडून डिसेंबर १९१७ मध्ये १ लाख २५ हजार रुपये १० टक्के प्रति महिना व्याजाने घेतले होते व महिन्याला १० हजार रुपये व्याज द्यायचे ठरले होते. त्याप्रमाणे अनिल माने यांनी माणिक ढोबळे याला १४ महिने १० हजार रुपये प्रमाणे व्याज दिले आहे. त्यानंतर आमचा ट्रक फायनान्सने ओढून नेल्याने व्याजाचा हप्ता चुकला. त्यावेळी ढोबळे यांने माने कुटुंबाला दमदाटी करुन सव्वा लाख मुद्दलेच्या बदल्यात २७ फेब्रुवारी २०१८ ला जांभूळवाडी येथील राहते घर जबरदस्तीने ५ वर्षे करीता मुदत खरेदी करून घेतले व जोपर्यंत पूर्ण रक्कम देत नाही तोपर्यंत महिन्याला १० हजार रुपये व्याज दयायचे असे धमकावून सांगितले.

माने यांची परिस्थिती नासल्याने व्याज देता आले नाही. शेवटी खासगी सावकार ढोबळे हा घर नावावर करुन देण्यासाठी मागे लागला. त्याकरीता वारंवार धमकावत होता. घर नावावर करुन देण्यास विरोध केल्याने पाच महिन्यांपूर्वी माणिक ढोबळे याने माझ्या वाघवाडी फाटा येथील माने यांच्या नाष्टा सेंटरवर येवून माने पती-पत्नीला लहान बंदूक दाखवून दमदाटी करुन शिव्या दिल्या. व्याजासह आणखी दोन लाख द्या नाहीतर तुम्हाला संपवून टाकीन, अशी धमकी दिली. दहशतीमुळे माने कुटुंब घराच्या बाहेरही पडले नाहीत. अखेर माने दाम्पत्याने धाडस करत पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरिक्षक वाघ तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.