मात्रोश्रीनंतर सिल्व्हर ओकवरही धमकीचा फोन

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थान उडवण्याची धमकी देणारा फोन आल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी देखील असाच फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हसत असल्याचे सांगत ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त होते. अशातच आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी देखील असाच फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. देशमुख यांनी कंगनावर, ‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही,’ अशी टीका केली होती. यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेला फोनचे लोकेशन दुबई असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांतर्फे कसून चौकशी करण्यात येत असून कोणी खोडसाळपणाने तर हा प्रकार केला नाही ना? या दृष्टीकोनातूनही प्रकरणाचा तपास करण्यात येतोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.