अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केल्याच्या घटनेने बॅालीवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. ही चाकू हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता बॅालीवूड इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. हे ईमेल पाकिस्तानमधून आल्याचे सांगण्यात आले आहेत. प्रसिद्ध कॅामेडियन कपिल शर्मा याला जीवे मारण्याची धमकीचा ईमेल आला आहे. त्याच्या अगोदर अभिनेता राजपाल यादव, कॅामेडियन सुगंधा मिश्रा आणि डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचे ईमेल आले आहेत.
या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीवर बीएनएसच्या कलम ३५१(३) नुसार एफआयर दाखल करण्यात आला आहे. या ईमेलमध्ये तुमच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. पुढील ८ तसांमध्ये उत्तर द्या अन्यथा वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणांमा सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. त्यानुसार कमिल शर्मा आणि राजपाल यादव यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझानेही या धमकेची ईमेल मिळाल्याचे सांगितले आहे.
ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला वाटतंय की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणं महत्त्वाचं आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला हा संदेश अत्यंत गांभीर्याने आणि गोपनीयतेने हाताळण्याची विनंती करतो. तसेच या ईमेलच्या शेवटी विष्णू असे नाव लिहिण्यात आले आहे. पुढील आठ तासांमध्ये उत्तर द्या अन्यथा तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर परिणांना सामोर जावे लागेल, अशी धमकी देण्यात आली आहे.
सेलिब्रेटींच्या सुरक्षेचा प्रश्न
माजी मंत्री बाबा सिद्दकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने स्विकारल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर सलखान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. सलमानने त्याच्या बाल्कनीत बुलेटप्रुफ काचा बसवल्या आहेत. नुकताच अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनांमुळे सिलिब्रेटींवरील हल्लामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.