नवी दिल्ली – खालिस्तान कमांडो फोर्सचे आतंकवादी गुरूपतवंत सिंह पन्नू यांनी अनेकांना व्हाईस काॅलद्वारे दिल्ली एअरफोर्सच्या दोन उड्डाणांबाबत धमकी दिली आहे.
5 नोव्हेंबर ला दिल्ली विमानातळावरून होणारी एअर इंडियाची दोन उड्डाणं लंडनला पोहोचू देणार नाही, अशी धमकी खलिस्तान कमांडो फोर्सने दिली आहे. याबाबत दिल्ली पोलीसांनी माहिती दिली आहे.
“फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”
धमकीचे फोन आल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. तसेच डीआयएएल, एअर इंडिया, एअरपोर्ट पोलीस, सीआयएसएफ जवान, स्पेशल सेल यांना सतर्क ठेवण्यात आले आहे.
याबाबत एअरपोर्टचे डीसीपी राजीव रंजन म्हणाले की, सिख फाॅर जस्टीस नावाची एक संस्था आहे. पाच नोव्हेंबरला एअर इंडियाची दोन उड्डाणे लंडनला पोहोचू देणार नाही असी धमकी त्यांनी दिली आहे.
यासंदर्भात आम्ही स्टोक होल्डर्स यांच्यासोबत मिटिंग घेतली. आतापासूनच सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे, अशी माहिती डीसीपी रंजन यांनी दिली आहे.
पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी