मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या एका निनावी फोनद्वारे ही धमकी देण्यात आली. यानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
Security tightened outside Taj Hotel & nearby areas after a threat call was received yesterday from Karachi, Pakistan to blow up the hotel with bombs: Mumbai Police pic.twitter.com/mu5Uf6qzCf
— ANI (@ANI) June 30, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीमधून ताज हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. यासंदर्भातील माहिती ताज हॉटेलच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून तपास सुरु केला आहे.
दरम्यान, २००८ साली पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये अनेक ग्राहकांवर बेछुट गोळीबार केला होता.