भारताचे पाकला सडेतोड उत्तर; ‘जैश’च्या तळांवर फेकले हजार किलोचे बॉम्ब

नवी दिल्ल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. तसेच या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली असून पाकवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत. यासंदर्भाचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. भारतीय वायूसेनेने केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वांत मोठी असल्याचे सांगण्यात येते.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले.

https://twitter.com/OmarAbdullah/status/1100228336054202369

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)