सरकार हाय हाय च्या घोषणा
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने आशा वर्कर्स महिलांना मानधन वाढ मिळावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत चक्री उपोषण आजपासून सुरू केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे सहा हजार पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी सरकार विरोधात दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.
राज्यातील आशा वर्कर्स युनियनच्या हजारो महिला आजपासून राज्यव्यापी बेमुदत चक्री उपोषणा साठी रस्त्यावर उतरल्या आहेत. या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या सहा हजार पेक्षा अधिक आशा वर्कर्स महिलांनी सहभाग घेतला आहे. आशा स्वयंसेविका कामाच्या आधारावर सध्या 2500 रुपये सरासरी मानधन व गटप्रवर्तक यांना मासिक आठ हजार रुपये मानधन मिळते.
हे मानधन अत्यल्प आहे. या मानधना मध्ये शासनाने वाढ करावी यासाठी वारंवार शासनाकडे विनंती करण्यात आली होती. परंतु अद्याप देखील शासनाने अशा वर्कर युनियन ची मागणी मान्य केली नाही. 27 ऑगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मानधन वाढीच्या कोणत्याही प्रस्तावावर ती सही न झाल्या मुळे कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा हजार महिलांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पाठिंबा देत सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.
आशा वर्कर च्या या आंदोलनामुळे कोल्हापूरच्या जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीची खूप मोठी कोंडी झाली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता
नेत्रदीपा पाटील (जिल्हाध्यक्ष) , कोल्हापूर