स्पेनच्या ‘ला पाल्मा’ बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक; हजारो जणांनी केले विस्थापन

लॉस लियालोस, द अरिदन, (स्पेन) – स्पेनच्या कॅनरी बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून या ज्वालामुखीतील लाव्हारस डोगरमाथ्यावरून ओघळू लागला आहे. त्यामुळे 5 हजारपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितठिकाणी हलवण्यात आले आहे. लाव्हा ला पाल्मा बेटावरून ताशी 700 मीटर वेगाने समुद्राच्या दिशेने वाहू लागला आहे, असे कॅनरी आयलॅंड व्होल्कॅनोलॉजी इन्स्टिटयुटने म्हटले आहे.

या जवालामुखीचा उद्रेक रविवारी दुपारी 3 वाजता झाला. त्यापूर्वी आठवडाभर या भागात भूगर्भातील हालचाली जाणवत होत्या. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्यातून काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाफा आणि तप्त लाव्हा बाहर फेकला जाऊ लागला. लाव्हा दोन प्रवाहांमधून वाहत असून लोकवस्ती नसलेल्या भागांमधून हा प्रवाह वाहत आहे आणि या लाव्हामुळे किमान 20 घरांचे नुकसान झाले आहे, असे कॅनरी बेटांवरील मुख्य सरकारी अधिकारी व्हिक्‍टर टोरेस यांनी सांगितले. ज्वालामुखीचा आणखीन उद्रेक होण्याची शक्‍यता नाही. मात्र सुरू असलेल्या लाव्हा प्रवाहामुळे खूप नुकसान होण्याची शक्‍यता आहे, असेही टोरेस यांनी सांगितले.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सेचेझ यांनी न्यूयॉर्कचा आपला नियोजित दौरा रद्द केला असून ते या भागाला भेट देऊन पहाणी करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.