…तरी मित्र म्हणून सहकार्य राहील; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मनसे नेतेपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील”, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.