Jitendra Awhad | Sambhaji Bhide – नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
पण काल, सोमवारी हा पुतळा कोसळला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ‘एरवी बोलणारे शांत आहेत,’ असे सांगत भाजपाच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीवर निशाणा साधला आहे.
मालवण येथे काही महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला अन् सबंध देशभर महाराष्ट्राची टिंगल टवाळी सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. किंबहुना, महाराष्ट्राची ओळखच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामुळेच आहे. असे असतानाही ५०… pic.twitter.com/JU9dtnSnZU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 27, 2024
यासंदर्भात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काल, सोमवारी, मूर्तीकार मूर्तीकार जयदीप आपटे याची एक मुलाखत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पुतळ्याच्या अनावरणानंतर जयदीप आपटे याने ही मुलाखत दिली आहे.
एरवी बोलणारे आज शांत साहे
त्यांना सांगा मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा अडवा पडला pic.twitter.com/L3qlwX1FQu— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 27, 2024
काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे, असे त्यांनी सुनावले आहे.
तर, आता पुन्हा याच मुद्द्यावर ट्वीट करत आमदार आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एरवी बोलणारे आज शांत आहेत. त्यांना सांगा मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.