Chitra Wagh Fahim Khan action | नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालवण्यात आला असून मोठी कारवाई प्रशासनाने केली आहे. फहीम खान याने नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली होती त्यानंतर त्याच्या घरावर महापालिका प्रशासनाने बुलडोझर फिरवत कारवाई केली आहे.
यानंतर आता विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी फहिम याच्या घरावर बुलडोझर फिरवतानाचा व्हिडिओ त्यांच्या एक्सच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. त्या व्हिडिसोबत वाघ यांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे मनसुबे असेच बुलडोझर खाली चिरडलं जाईल, असे म्हटले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्याल तर बुलडोजर कारवाईला तयार रहाल, असा इशाराही त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फहिम खानच्या घरावर बुलडोजर कारवाई. या देशद्रोह्याने नागपूरमधील घर हे बेकादेशीर बांधकाम होतं.त्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे मनसुबे असेच बुलडोझर खाली चिरडलं जाईल. कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्याल तर बुलडोजर कारवाईला तयार रहाल पुन्हा एकदा सांगते कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल, असे चित्रा वाघ यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फहिम खानच्या घरावर बुलडोजर कारवाई.
या देशद्रोह्याने नागपूरमधील घर हे बेकादेशीर बांधकाम होतं.त्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं.
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे मनसुबे असेच बुलडोझर खाली चिरडलं जाईल.
कायदा आणि सुव्यवस्था हातात… pic.twitter.com/rDmvF2TUas
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 24, 2025
धडक कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा या हिंसाचारातील मास्टर माईंड आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर फिरवत धडक कारवाई केली आहे.