मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पेटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देत खळबळ उडवून दिली. वरळी डोम येथील विजयी जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग, “गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नही साला,” असा टोमणा मारत शिंदेंवर हल्लाबोल केला होता.
याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “उठण्याची भाषा कोण करतंय? त्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाची वाफ सोडून चालत नाही. तीन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला, तेव्हा हे आडवे झाले. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरावा लागतोय”.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला सणसणीत प्रत्युत्तर देताना 2022 च्या बंडाचाही उल्लेख केला. “तीन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला, तेव्हा फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता, आणि हे आडवे झाले. त्यातून ते अजून सावरले नाहीत. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरायचा प्रयत्न सुरू आहे,” असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या मेळाव्यावरही शिंदे यांनी निशाणा साधला. “एकाने मराठीबद्दलची तळमळ बोलून दाखवली, दुसऱ्याने मात्र सत्तेची मळमळ व्यक्त केली. कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा अजेंडा नको, असं ठरलं होतं. पण एकाने ते पाळलं, तर दुसऱ्याने स्वार्थाचा अजेंडा राबवला,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं : राज ठाकरे
आजचा हा मेळावा, मोर्चा आणि मेळाव्याला तीच घोषणा आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे कुणी वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपिठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असा थेट टोलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर….
“हिंदी सक्तीचे अचानक कुठून आले, ते मला समजलेच नाही. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही? कुणालाही न विचारता आम्ही ते लादणार असे झाले. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर…. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही,असा इशारच राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. Raj Thackeray |
आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्यावर केंंद्रस्थानी ठेऊन राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले. आमच्या अंतर्पाठ अनाजी पंतांनी दूर केला, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.