आम्ही हाकलून दिलेल्यांना सपा, भाजप मध्ये प्रवेश – बसपा

बलिया  – बहुजन समाज पक्षातून हाकलून देण्यात आलेल्या नेत्यांना समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यांच्या आधारावर हे दोन्ही पक्ष सत्तेवर येण्याची स्वप्ने पहात आहेत असे बहुजन समाज पक्षाचे विधानसभेतील नेते उमाशंकरसिंह यांनी म्हटले आहे.

आम्ही ज्या नेत्यांना त्यांच्या खराब प्रतिमेमुळे पक्षातून हाकलले आहे अशा लोकांना प्रवेश देऊन सपा आणि भाजपचे लोक त्यांना सन्मान देण्याचे काम करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या पक्षातील कोणत्याही नेत्याचा गैरकारभार खपवून घेत नाहीत अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.

पण याच नेत्यांना सपा आणि भाजपा त्यांच्या पक्षात घेऊन बहुजन समाजपक्षावर कुरघोडी केल्याचा आव आणत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. बहुजन समाज पक्षातून हाकलून देण्यात आलेल्या काही आमदारांनी सपा व भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. बहुजन समाज पक्षाचे विधामंडळ नेते शाह आलम यांनीही अलिकडेच बहुजन समाज पक्षाचा राजीनामा दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.