“त्या’ बालिकांवर झाला होता अत्याचार

पिंपरी – भोसरी मधील नूर मोहल्ल्‌यात रविवारी जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या तीन चिमुकल्यांना निर्दयीपणे फासावर लटकवून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सात आणि नऊ वर्षांच्या या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुलींचा पिताच संशयांच्या घेऱ्यात असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

नऊ व सात वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली तसेच सहा वर्षांच्या मुलाला गळफास लावून त्यांच्या जन्मदात्या आईने स्वत: आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला गरीबीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर गळफास दिलेल्या दोन्ही मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे, या घटनेला आता वेगळेच वळण मिळाले आहे. आपल्या निष्पाप लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आईने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलींवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चिमुकलीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. तसेच पोलिसांनी घराची तपासणी केली, मात्र त्यांना संशयास्पद काही सापडलेले नव्हते. मात्र, रविवारी वायसीएम रुग्णालयात चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यांनतर पोलिसांनी चिमुकलीच्या पित्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.