“त्या’ बांधकामधारकांना शास्तीची रक्कम मिळणार परत

शास्तीपोटी भरलेली दंडाची रक्कम महापालिका वळती करून देणार

सुमारे 60 कोटींची तूट

शहरात एकूण 79 हजार 774 अनधिकृत बांधकामांना शास्ती कर आकारणी केली जात आहे. शासनाने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर माफ केला आहे. त्यानुसार एकूण 56 हजार तर एक हजार ते 2 हजार चौरस फुटाच्या 14 हजार 500 बांधकामांना निम्मा शास्तीकर लागू आहे. त्यांच्याकडून 1 एप्रिल 2012 पासून येणे असलेली शास्तीकराची थकबाकी माफ झाली आहे. त्यामुळे शास्तीकर थकबाकी वगळून केवळ मिळकतकर भरावा लागणार असल्याने नागरिकांना आर्थिक लाभ होणार आहे. परिणामी, नागरिक मिळकतकर भरण्यास पुढे येतील. मात्र, पालिकेच्या तिजोरीत सुमारे 55 ते 60 कोटींची तूट होणार आहे.

पिंपरी  – पिंपरी-चिंचवडमधील 600 चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामधारकांना शास्तीकराची शंभर टक्के माफी आणि 601 ते एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामधारकांना शास्तीकरात 50 टक्के सवलत पूर्वलक्षी प्रभावाने देण्याच्या निर्णयामुळे याचा शहरातील सुमारे 56 हजार मिळकतधारकांना फायदा होणार आहे.

निर्णय होण्यापर्यंतच्या कालावधीत नागरिकांची शास्ती दंडाची रक्कम भरली असल्यास ही रक्कम पुढील करपट्टीमध्ये वळती केली जाणार असल्याचे करसंकलन व करआकारणी विभागाचे प्रमुख प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले. तर एक ते दोन हजार चौरस फुटाच्या साडे चौदा हजार बांधकामांना 50 टक्के शास्ती कर भरावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदीनुसार शहरामध्ये एकूण 5 लाख 14 हजार 190 मिळकती आहेत. त्यामधील 4 लाख 36 हजार 285 निवासी मिळकती आहेत. महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला होता. राज्य सरकारने सुरवातीला शास्ती करामध्ये 600 चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना माफी दिली होती. तर, 601 ते 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांसाठी शास्ती करात 50 टक्के सवलत दिलेली होती.

दरम्यान, 4 मार्च 2019 ला शासनाने काढलेल्या आदेशानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकरात माफी दिली आहे. याचा फायदा सुमारे 56 हजार मिळकतींना झाला आहे. शास्तीकर माफीबाबत सुरुवातीला शहरातील 600 चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात आला होता. त्यांनंतर ही मर्यादा वाढवून एक हजार चौरस फुटांपर्यंच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर माफ करणयात आला. मात्र दरम्यानच्या काळात अनेक मिळकत धारकांनी शास्तीकर भरला आहे. ही शास्ती कराची रक्कम परत मिळावी अशी मागणी करण्यात येत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.