पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हा महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे.
सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आला होता.