यंदा हज यात्रेसाठी दोन लाख भाविक जाणार

नवी दिल्ली – यंदाच्या हज यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविकांची नोंदणी करण्यात आली असून हा एक विक्रम आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. ते म्हणाले की यंदा मेहराम शिवाय 2340 महिला ही यात्रा करणार आहेत.

या पुरूष साथीदाराशिवाय हज यात्रा करणाऱ्या महिला आहेत. गेल्या वर्षी 1180 महिलांनी पुरूष साथीदारशिवाय ही यात्रा केली होती. हे सर्व यात्रेकरू कोणत्याही सबसीडीशिवाय तेथे जाणार आहेत. त्यांच्यासाठी पाचशे विमानांची सोय केली जाणार आहे. आणि देशातील 21 शहरांतून हजसाठी विमाने सोडली जाणार आहेत. एकूण यात्रेकरूंपैकी 48 टक्के यात्रेकरू या महिला आहेत अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.

या एकूण यात्रेकरूंपैकी 1 लाख 40 हजार यात्रेकरू हज कमिटी मार्फत जाणार असून 60 हजार यात्रेकरू हज ग्रुप ऑर्गनायझेशन मार्फत तिकडे जाणार आहेत.

या यात्रेकरूंच्या आरोग्य विषयक सेवेसाठी मक्केत 16 आणि मदिनेत 3 आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याखेरीज आधिकचे उपचार करण्यासाठी मक्‍केत तीन आणि मदिनेत एका हॉस्पीटलचीहीं सोय करण्यात आली आहे. हज यात्रेच्या संबंधात माहिती देण्यासाठी दोन दिवासांचे विशेष प्रशिक्षणही आयोजित करण्यात येत आहे.हज यात्रेसाठी निर्धारीत विमानतळांवरून 4 जुलै ते 31 जुलै या कालावधीत विमाने सोडण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)