यंदा श्री गणेश सूर्यमंदिराची पर्वणी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टची माहिती

पुणे – यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 127 व्या वर्षानिमित्त कोर्णाक येथील श्री गणेश सूर्यमंदिराच्या आधारावर ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. गणेश चतुर्थीला दि. 2 रोजी (सोमवार) सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प.पू. विश्‍वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन सायंकाळी

7 वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुनील रासने, डॉ. बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विवेक खटावकर, प्रकाश चव्हाण, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले 21 नागरथावर लावण्यात येणार आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी 12.30 नंतर भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे. तर दि.3 रोजी (मंगळवारी) पहाटे ऋषीपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 25 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण, गणेशयाग आणि हरी जागर होणार आहे. दि. 4 रोजी (बुधवारी) सूर्यनमस्कार आणि दि. 5 रोजी (गुरुवारी) अग्निहोत्र यांसह उत्सवात वेदपठण, हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. अनंत चतुर्दशीला (दि.12) रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री विकटविनायक रथातून निघणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.