यंदा जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढणार

पुणे -राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश कोरडे झाल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे. शहराचेदेखील तापमान वाढणार असून, चैत्र महिन्यातच तापमानात वाढ होण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे.

आठवडाभरातील दोन दिवस पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अनेक भागांत मळभ दूर झाले आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश कोरडे झाल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे.

राज्यात साधारणपणे मार्चपासून उन्हाचा चटका वाढला होता. परंतु नऊ एप्रिलपासून वातावरणात पुन्हा वेगाने बदल झाले. त्यामुळे दहा एप्रिलपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पूर्वमोसमी पावसास सुरुवात झाली.

जवळपास आठवडाभर ढगाळ वातावरण होते. तर दोन दिवस पावसाने शहर व मावळ तालुक्‍याला चांगलाच दणका दिला असून काही ठिकाणी गारपीट, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या काळात कमाल तापमानाचा पारा वेगाने खाली आला होता.

किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. तर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.