यंदा शहरात अधिकृत 64 फटाके स्टॉल

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ

पिंपरी – दिवाळी अवघ्या आठ दिवसावर आली असल्याने फटाके विक्रेत्यांनी स्टॉल लावण्यासाठी अग्निशामक विभागकडून दाखले व नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी सुरुवात केली होती. याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरातील फटाका विक्रेत्यांनी मोठा प्रतिसाद देत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पटीने परवाने घेतले आहे. गेल्यावर्षी फटाका विक्रिसाठी 36 जणांनी परवाने घेतले होते. मात्र, यंदा त्यात मोठी वाढ झाली असून शनिवारी (दि.19) पर्यंत दिलेल्या मुदतीत 64 जणांनी अग्निशामक विभागाकडून आवश्‍यक त्या अटी व कागदपत्राची पुर्तता करत परवाने घेतले आहेत.

दिवाळीनिमित्ताने शहरात अनेक ठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल लागतात. मात्र, त्याची सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्‍यक असल्याने अग्निशामक विभागाकडून याबाबत सर्व तपासाणी केल्यावर त्यांना दाखले दिले जातात. यासाठी अग्निशामककडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, त्याची पुर्तता केल्यावरच विक्रेत्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यात, फटाका स्टॉलसाठी पक्के आर.सी.सी चे रोलींग शटरसह दुकानाचा स्वतंत्र्य गाळा, आवश्‍यकत्या सुरक्षा यंत्रणा आदीची काळजी घेतली जानार आहे.

शहरातील फटाका विक्रेत्यांनी अटी व आवश्‍यक त्या, कागदपत्राची पुर्तता करत तब्बल 64 जणांनी नाहरकत परवाने घेतले आहे. गेल्यावर्षी फक्त 36 जणांनीच परवाने घेतले होते. मात्र, यंदा अटी व नियमाचे पालन करणाऱ्या फटाके स्टॉलची संख्या जादा दिसणार आहे. यासाठी 7 ते 18 ऑक्‍टोबर पर्यंत 76 अर्ज वाटप करण्यात आले होते. तर, भरलेले अर्ज 18 ऑक्‍टोबर पर्यंत द्यायचे होते. तर, परवाने मिळविण्याची अंतिम तारीख 19 ऑक्‍टोबर पर्यंतच होती. शनिवार (दि.19) पर्यंत 64 जणांनी परवाने घेतले असल्याची माहिती अग्निशामक विभागाकडून मिळाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.