नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही. त्याऐवजी अर्थसंकल्प संसद सदस्यांना एलेक्ट्रॉनिकली( सॉफ्ट कॉपी) पाठविण्यात येईल.
करोना व्हायरमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी प्रिंटिंग प्रेस मध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांना काही दिवस आत थांबून राहावे लागते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया चालू असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात कधी नाही इतका चांगला अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. विविध संघटना सध्या आपले प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवीत आहे.
ज्याअर्थी अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही त्याअर्थी छपाई अगोदर अर्थमंत्रालयात अर्थमंत्री ऩिर्मला सितारमण यांच्या उपस्थितीत होणारा हलवा तयार करण्याचा कार्यक्रमही होणार नाही.