नवी दिल्ली – यंदाचा प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी वेगळा असणार असून त्यात अनेक नवीन उपक्रम सादर केले जाणार आहेत. यात लेझर शोही पहिल्यादांच सादर केला जाणार असून एक हजार ड्रोन्सच्या शो चाही या संचलनात समावेश असणार आहे.
मेजर जनरल अलोक कक्कर यांनी ही माहिती दिली. जीओसी जनरल व्ही. के. शर्मा आणि आपण या संचलनाचे नेतृत्व करणार आहोत असे कक्कर यांनी सांगितले. ते म्हणाले की यंदा प्रथमच नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकच्या भिंतीवर लेझर प्रोजेक्शन सादर केले जाणार आहे.
त्यानंतर जो ड्रोन शो होणार आहे त्यात किमान एक हजार ड्रोन सहभागी केले जाणार आहेत. संरक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या विचारविनीमयातून प्रजासत्ताक दिन संचलनाचा कार्यक्रम निश्चीत करण्यात आला आहे.
या संचलनाला कोविडमुळे उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्याने संरक्षण मंत्रालयाने हा सोहोळा थेट प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि युट्युब चॅनेलही सुरू करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.