“…यातच भाजपची चार वर्षे जाणार” – चंद्रकांत पाटलांना जयंत पाटलांचे प्रतिउत्तर

पुणे – महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी टीका विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने आता एक वर्ष पूर्ण केलं आहे. दरम्यान, बिहार विधानसभा व अन्य राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर राज्यातील सरकार लवकरच कोलमडेल असे दावे पुन्हा एकदा करण्यात येत आहेत.

राणेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे…’

सरकारच्या भवितव्याबाबत प्रशचिन्ह उपस्थित करण्यात येत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ” महाविकास आघाडीचं सरकार दोन महिनेही टिकणार नाही असं जेव्हा आम्ही शपथ घेतली तेव्हा भाजपाचे नेते म्हणत होते. आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झालं. आताही भाजपाचे लोक हेच म्हणत आहेत की सरकार पडेल. मला खात्री आहे की उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे.” जयंत पाटील यांनी हा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

“नितीश कुमारांनी शरद पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा”

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. परंतु हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता हे उघड करता येणार नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवित आहोत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“अर्णव यांना जामीन देत सर्वोच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सणसणीत चपराक”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.